पुणे लोकसभेची जागा मिळवण्यात काँग्रेसला यश, राष्ट्रवादीने हट्ट सोडला !

पुणे लोकसभेची जागा मिळवण्यात काँग्रेसला यश, राष्ट्रवादीने हट्ट सोडला !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक सुरु आहे. आघाडीतील जागावाटपाबाबत ही बैठक सुरु आहे. आजपर्यंत पुणे लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हट्ट होता परंतु आज मात्र अखेर पुण्याच्या लोकसभेच्या जागेचा हट्ट राष्ट्रवादीने सोडला आहे. शरद पवार निवडणूक लढवण्यास तयार नसल्यामुळे राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवरील हट्ट सोडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान शरद पवारांनी पुण्याची जागा लढवावी असा राष्ट्रवादीचा आग्रह होता. परंतु आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका पवापांनी घेतली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या जागेवरील हट्ट राष्ट्रवादीने सोडला असून पुणे लोकसभा मतदारसंघ राखण्यात काँग्रेसला यश आलं आहे. परंतु अद्यापही सहा मतदारसंघावरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. नगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या सहा जागांचा तिढा मात्र अजन सुटलेला दिसत नाही.

COMMENTS