पुण्यात मुस्लिम मूक मोर्चाला मोठा प्रतिसाद !

पुण्यात मुस्लिम मूक मोर्चाला मोठा प्रतिसाद !

आरक्षणाच्या मुद्यावरुन आता मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा, धनगर नंतर आता मुस्लिम समाजाने मोर्चाचं आयोजन केलं आहे. पुण्यात सुरू झालेल्या मुस्लिम मूक मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्याच्या अनेक भागातून मुस्लिम बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. नोकरी आणि शिक्षणामध्ये 5 टक्के आरक्षण देण्याची मुस्लिम समाजाची मागणी आहे.

दरम्यान या मोर्चाचं रस्त्यातच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे आणि मराठा समाजातील व्यक्ती मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गोळीबार चौकातून सुरु झालेला हा मोर्चा कौन्सिल हॉलला जाणार आहे.

COMMENTS