पुणे – राष्ट्रवादीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर बहिष्कार !

पुणे – राष्ट्रवादीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर बहिष्कार !

पुणे – शहरातील मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येत आहेत. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपकडून राज्यातील अनेक नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. परंतु  मेट्रो ३ प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिली आहे.

दरम्यान म्हाळुंगे-बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा नगरीत हा कार्यक्रम होत आहे. हे कार्यक्रम स्थळ बारामती लोकसभा मतदारसंघात येतं. असं असताना देखील निमंत्रण पत्रिकेत स्थानिक खासदारांना डावलण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून बहिष्कार टाकण्यात आला असल्याचं वैशाली नागवडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS