आजपासून आरएसएसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक !

आजपासून आरएसएसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक !

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या पाच दिवसीय चिंतन बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. मुळशी तालुक्यातील कोळवण येथे  ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह, संघाच्या देशभरातील विविध प्रांतांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान केंद्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लालं असून या बैठकीत संघविस्तार, हिंदुत्व यांसह देशभरातील दलित अत्याचाराच्या घटना, आंदोलने अशा विविध मुद्द्यांवर विचारमंथन होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या बेठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

 

 

 

 

COMMENTS