शरद पवारांच्या सल्ल्यानंतर उदयनराजेंनी घेतला ‘हा’ निर्णय !

शरद पवारांच्या सल्ल्यानंतर उदयनराजेंनी घेतला ‘हा’ निर्णय !

पुणे – राष्ट्रवादीचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज तातडीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पावर यांची पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीतच राहण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांच्या सल्ल्यानंतर उदयनराजेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मागे घेतला असून ते आता राष्ट्रवादीतच राहणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी आजची बैठक विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी होती. पक्षाची भूमिका काय असेल, यासाठी चर्चा झाली. भाजप प्रवेशाबाबत उदयनराजेंनी कधीच वक्तव्य केलेले नाही. महाराष्ट्रातील प्रश्नांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपच्या गोटातून ही बातमी पसरविण्यात आली होती. उदयनराजेंच्या नाराजीबाबत विषयच नाही. शिवस्वराज्य यात्रेवेळी त्यांच्यामागे अनेक कामे होती. त्यामुळे त्यांना येता आले नसल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS