प्रदीप शर्मा यांच्यानंतर आणखी एक पोलीस अधिकारी शिवसेनेच्या वाटेवर?

प्रदीप शर्मा यांच्यानंतर आणखी एक पोलीस अधिकारी शिवसेनेच्या वाटेवर?

मुंबई – एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता आणखी एक पोलीस अधिकारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं दि त आहे. पुण्यातून सहाय्यक पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झालेले एन्काऊन्टर स्पेशालिस्ट भानुप्रताप बर्गे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बर्गे यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे बर्गेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

http://www.facebook.com/story.php?story_fbid=412885199361700&id=334320043884883&scmts=scwspsdd

दरम्यान पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी बर्गे इच्छुक असल्याची माहिती आहे. बर्गे यांना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी काही निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये बैठक घेतलीली. यावेळी या अधिकाऱ्यांनी बर्गेंची उमेदवारी मिळवण्याला ‘चायना गेट‘ मिशन असे संबोधले तसेच त्यांच्या सारख्या एका चांगल्या अधिकाऱ्याला संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे बर्गे यांना शिवसेना उमेदवारी देणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS