पुण्यात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश!

पुण्यात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश!

पुणे – पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं असून त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला ही अत्यंत क्लेशदायक घटना आहे. या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे तसेच जे जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम पडू दे असंही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान मृतांमध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचा आणि एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.या प्रकरणी दोषी बिल्डर आणि कंत्राटदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच त्यांच्यावर कोठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली आहे. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. भेटीनंतर त्यांनीही दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

COMMENTS