आंबेगावातून विधानसभा निवडणूक लढवणार का ?, पूर्वा वळसे पाटील यांनी केलं स्पष्ट !

आंबेगावातून विधानसभा निवडणूक लढवणार का ?, पूर्वा वळसे पाटील यांनी केलं स्पष्ट !

मुंबई – आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानस़भा माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली होती.परंतू मी कुठलीही निवडणूक लढवणार नसल्याचं खुद्द पूर्वा वळसे पाटील यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून ट्विट केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्वा वळसे या निवडणूक लढवणार नसल्याचं स्डपष्ट झालं आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून महिला आणि तरुणांना जास्तीत जास्त संधी देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानस़भा माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती.परंतू मी कुठलीही निवडणूक लढवणार नसल्याचं खुद्द पूर्वा वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS