सुजय विखे यांच्या पक्ष सोडण्याच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया !

सुजय विखे यांच्या पक्ष सोडण्याच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया !

मुंबई –  आई- वडिल काँग्रेस पक्षात असले तरी मला कोणत्या पक्षात काम करायचे आणि कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे याचे व्यक्तिस्वातंत्र असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सुजय विखे पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.

परंतु यावर आता स्वतः राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मौन सोडलं आहे.सुजय, काँग्रेस पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. देशाला काँग्रेस विचारांचीच गरज असून, हाच विचार तो पुढे घेऊन जाईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सुजय यांनी केलेले वक्तव्य मी ऐकले. कोणी कुठे, कोणत्या पक्षात काम करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. तसेच लोकशाहीत आपले मत मांडण्याचा सर्वांना अधिकार व व्यक्तिस्वातंत्र्यही आहे. सुजय तरूण, सुशिक्षित आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे मत मांडले असेल. पण ते काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाहीत याची मला खात्री आहे.

देशाला काँग्रेस विचाराची गरज असून, हा विचार सुजय पुढे घेऊन जाईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. त्यामुळे ते काँग्रेस पक्षाचेच काम करत राहतील असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS