राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये नाही तर ‘या’ पक्षात जाणार, प्रचारसभेतही घेतला सहभाग ?

राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये नाही तर ‘या’ पक्षात जाणार, प्रचारसभेतही घेतला सहभाग ?

मुंबई – विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु आता विखे पाटील हे भाजपमध्ये जाणार नसून ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचं कारण म्हणजे आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट शिवसेनेच्या मंचावर प्रचारसभेत सहभाग घेतला होता.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची प्रचारसभा सुरू होती. या प्रचारसभेला खुद्द विखे पाटील उपस्थित होते. इतकंच नाही, तर त्यांनी भाषण देखील केलं. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेतच जाणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान विखे पाटील हे कोणत्या पक्षात जाणार त्यासंदर्भातली आपली भूमिका उद्या स्पष्ट करणार आहेत. भाजपकडून मात्र विखे पाटील आपल्याच पक्षात येणार असल्याचे दावे केले जात आहेत. नगरमधील प्रचारसभेमध्ये जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांनी ‘राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्येच येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विखे पाटील उद्या काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS