शासकीय निवासस्थानी पोलिसांकडून हेरगिरी, विखे पाटलांची राज्यपालांकडे तक्रार !

शासकीय निवासस्थानी पोलिसांकडून हेरगिरी, विखे पाटलांची राज्यपालांकडे तक्रार !

मुंबई – शासकीय निवासस्थानी पोलिसांकडून हेरगिरी होत असल्याची तक्रार विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. याबाबत राज्यपालांकडे लेखी तक्रार केली असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात तातडीने चौकशी करून गृहखात्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी राज्यपाल सी विद्यासागरराव यांच्याकडे केली आहे.

 

https://twitter.com/RVikhePatil/status/957222539687739393

 

दरम्यान माझ्या शासकीय निवासस्थानी पोलिसांकडून हेरगिरी होत असल्याच्या प्रकाराविरोधात मी माननीय राज्यपालांकडे लेखी तक्रार केली आहे. यासंदर्भात तातडीने चौकशी करून गृहखात्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी माननीय राज्यपालांना केली असल्याचं ट्वीट विखे पाटील यांनी केलं आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी ‘मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विशेष शाखेचे दोन पोलीस कर्मचारी हेरगिरी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता.

 

COMMENTS