सुजय विखे राष्ट्रवादीत जाणार का?, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया !

सुजय विखे राष्ट्रवादीत जाणार का?, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया !

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून सुजय राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार ही माध्यमातून माहिती समोर आली आहे. याबाबत मला माहिती नाही. तसेच याबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घ्यायला हवा, वेगवेगळे मतप्रवाह असून काँग्रेस पक्षाला जागा सोडावी असा आमचा आग्रह आहे. दोन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, नगरच्या जागेबाबत काय निर्णय होतो त्यानंतर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य करायचा असं कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरले असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर ते आपल्याला मान्य असेल का? असे विचारले असता याबाबत आघाडी जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी तयार नसताना सुजय विखे पाटील कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याची चर्चा सुरू झाली आहे. ही जागा काँग्रेसला मिळाली नाही तर सुजय विखे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राष्ट्रवादीकडून सुरू झाली आहे. जागावाटपाबाबत सन्मानजनक तोडगा निघावा असं विधान करत नगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडावी असेही विखे यांनी सूचित केले आहे.

COMMENTS