…तर राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज रद्द होणार!

…तर राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज रद्द होणार!

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला  आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत प्रश्न उपस्थित करत अमेठीतील अपक्ष उमेदवार धृवलाल यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे.यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी केली आहे.यासंदर्भातील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे. या सुनावणीकडे लक्ष लागलं असून अपक्ष उमेदवार धृवलाल यांच्या बाजूने कोर्टानं निर्णय दिला तर राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो असं बोललं जात आहे.

दरम्यान २००४ मधील उमेदवारी अर्जात राहुल गांधींनी बॅक ऑफ्स लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्याचे म्हटले होते. या कंपनीची कागदपत्रे ब्रिटनमध्ये सादर करण्यात आली होती. यात राहुल गांधी हे ब्रिटन नागरिक असल्याचे म्हटले होते. भारताचे नागरिकत्व नसल्यास निवडणूक लढवता येत नाही त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी तक्रारदारांने केली आहे. तसेच याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी भाजपनेही केली आहे.

COMMENTS