राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत – अडवाणींचे माजी सहकारी सुधींद्र कुलकर्णी

राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत – अडवाणींचे माजी सहकारी सुधींद्र कुलकर्णी

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे माजी सहकारी सुधींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.’पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. त्यामुळे काश्मीर प्रश्न सोडवू शकणाऱ्या नेत्याची या देशाला गरज असल्यामुळे भविष्यात राहुल गांधी हे  पंतप्रधान झाले पाहिजेत असं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान चीन आणि पाकिस्तानच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधताना कुलकर्णी यांनी हे विधान केलं असून देशातील मोठ्या समस्या सोडविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले असल्याचं कुलकर्णी यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी हे मोठ्या मनाचा नेता असल्याचं म्हणत त्यांचं कौतुकही केलं आहे. त्यामुळे राहुल गांधी हे देशातील समस्या सोडवून शकतात असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राहुल गांधी हेच आगामी काळात पंतप्रधान झाले पाहिजेत अशी इच्छा कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS