सत्तेवर आलो तर 10 दिवसात कर्जमाफी देऊ – राहुल गांधी

सत्तेवर आलो तर 10 दिवसात कर्जमाफी देऊ – राहुल गांधी

नवी दिल्ली – आगामी निवडणुकीत सत्तेवर आलो तर 10 दिवसात कर्जमाफी देऊ असं आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील शेतक-यांना दिलं आहे. छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजप सरकारवरही जोरदार टीका केली आहे. तसेच जीएसटी, नोटाबंदी करुन भाजप सरकारनं जनतेची फसवणूक केली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपनं अनेक आश्वासनं दिली परंतु ती पूर्ण केली नाही. आपण मात्र तसं करणार नसून जे आश्वासन आता देतोय ते पूर्ण करणार असल्याचंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कर्नाटक आणि पंजाबमधील निवडणुकांदरम्यान काँग्रेसनं शेतक-यांना कर्जमाफीचं दिलेलं अश्वासन सत्तेवर आल्यानंतर पाळलं असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्येही आम्हाला एक हाती सत्ता द्या तुम्हाला दहा दिवसात कर्जमाफी देऊ असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी 12 आणि 20 नोव्हेंबररोजी मतदान घेण्यात येणार असून 11 डिसेंबररोजी मतमाजणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी याठिकाणी जाहीर सभा घेतली आहे.

COMMENTS