महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट, विधानसभा अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष बदलणार?

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट, विधानसभा अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष बदलणार?

नवी दिल्ली – राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा सुरु झाली आहे.  नाना पटोले यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. तर नाना पटोले यांतच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यपद सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सध्या काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. मंत्रिपद, महाविकास आघाडीशी समन्वय आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद अशी तिहेरी जबाबदारी सांभाळताना बाळासाहेब थोरात यांची तारांबळ होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे बदल केले जाणार असल्याचं बोललं जात आहे.

तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कोणतंही मंत्रीपद नाही, शिवाय पक्षातही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांच्यावर विधानसभा अध्यक्षपद दिलं जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले हे दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी गेले होते. परंतु या दोन्ही नेत्यांची तुर्तास भेट टळली आहे. ‘कोरोना’ संकटामुळे आपण पुढच्या वेळी भेट घेऊ, असा निरोप राहुल गांधी यांनी नाना पटोले यांना दिला आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ही चर्चा तूर्तास तरी टळली आहे.

COMMENTS