भाजप कार्यकर्त्यांकडून शिका, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला !

भाजप कार्यकर्त्यांकडून शिका, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला !

नवी दिल्ली – भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांकडून शिकण्याचा सल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत ते बोलत असताना राहुल गांधी यांनी हा सल्ला दिला आहे. तसेच या बैठकीत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी रणनिती बनवण्यावर जोर दिला असून कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहे.

दरम्यान यावेळी राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाचे उदाहरण देत दशकापूर्वी आदिवासी समाज काँग्रेसचा मतदार होता. पण भाजपा आणि संघाचे कार्यकर्ते आदिवासींमध्ये गेले. त्यांच्याबरोबर काम केले. त्यांना समजावले आणि आज ते भाजपाचे मतदार बनले आहेत. त्यामुळे या समाजासाठी जास्तीत जास्त काम करा. त्यांना सोबत घेऊन चलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या अडीअडचणींना उभे राहा. त्यामुळे हा समाज पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी होईल असा सल्लाही राहुल गांधी यांनी यावेळी दिला.

 

COMMENTS