राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल, या मतदारसंघातून लढवणार निवडणूक!

राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल, या मतदारसंघातून लढवणार निवडणूक!

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अरेज दाखल केला आहे. केरमळमधील वायनाड मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बहिण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या.

राहुल गांधी यावेळी पारंपारिक मतदारसंघ अमेठी आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अमेठीत राहुल गांधींचा सामना भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याशी असणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी स्मृती इराणी यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीतही राहुल गांधीच जिंकणार असल्याचा विश्वास काँग्रेसला आहे.

दरम्यान वायनाड लोकसभा मतदारसंघात वायनाड आणि मलप्पूरम जिल्ह्यातील प्रत्येकी तीन आणि कोझीकोडेमधील एक विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. वायनाड लोकसभा मतदारसंघात एकूण सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वायनाड हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. यूडीएफचा घटक पक्ष असलेल्या इंडियन युनियम मुस्लिम लीगचा या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे.

COMMENTS