लोकसभेत राहुल गांधींनी घेतली पंतप्रधान मोदींची गळाभेट !

लोकसभेत राहुल गांधींनी घेतली पंतप्रधान मोदींची गळाभेट !

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या आसनाकडे जाऊन गळाभेट घेतली आहे.लोकसभेतील भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनाकडे जाऊन त्यांनी मिठी मारत मोदींची गळाभेट घेतली. तसेच भारतीय संस्कृतीनुसार ते पंतप्रधान मोदी यांच्या पायाही पडले. त्यामुळे लोकसभेत राहुल गांधींचीच चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान यावेळी राहुल गांधी यांनी तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. तुम्ही मला पप्पू म्हणून शकता, शिव्या देऊ शकता.परंतु माझ्या मनात तुमच्याबद्दल द्वेष नाही, असं  म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना मिठी मारली. त्यानंतर राहुल गांधी आपल्या जागेवर परत जात असताना मोदींनी गांधी त्यांना परत बोलावून हस्तांदोलन केले.

दरम्यान लोकसभेतील भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच भाजपच्या खासदारांकडूनच खूप चांगले बोलल्याबद्दल माझे अभिनंदन करण्यात आले. भाजप, संघ आणि मोदींनी मला हिंदुस्तानी असल्याचा अर्थ समजावला असं म्हणत राहुल गांधी यांनी यावेळी मोदींचे पाय धरले होते.

COMMENTS