राहुल गांधी महाराष्ट्रातील ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढवणार निवडणूक ?

राहुल गांधी महाराष्ट्रातील ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढवणार निवडणूक ?

मुंबई – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातून लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे ते नांदेडच्या मतदारसंघातून ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच दोन जागांवरुन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी राहुल गांधींसमोर एकूण तीन जागांचा पर्याय समोर ठेवण्यात आला असून यामध्ये नांदेड, अमेठी आणि मध्य प्रदेशातील एका जागेचा समावेश आहे.

दरम्यान नांदे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून मोदी लाट असतानाही मागील निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण  खासदारपदी निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित मानला जात असून याठिकाणाहून राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

एखाद्या उमेदवाराला दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गुजरातसोबत उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींनी निवडणूक लढवली होती, त्याचा फायदा मोदींना झाला. त्यामुळे काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे राहुल गांधीही लोकसभेटी निवडणूक दोन मतदारसंघातून लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

 

COMMENTS