राहुल गांधी वाजपेयींना भेटण्यासाठी गेल्यानंतर भाजप नेत्यांची पळापळ !

राहुल गांधी वाजपेयींना भेटण्यासाठी गेल्यानंतर भाजप नेत्यांची पळापळ !

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आज नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विविध तपासण्यांसाठी अटल बिहारी यांना दाखल करण्यात आलं असून आज सायंकाळी 5 ते  6 च्या दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रुग्णालयात जाऊन अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी केली.

दरम्यान राहुल गांधींनी अचानक रुग्णालयामध्ये जाऊन वाजपेयींची भेट घेतल्यामुळे भाजपच्या नेत्यांची मात्र मोठी पळापळ झाली असल्याचं पहावयास मिळालं आहे. कारण राहुल गांधी यांच्या भेटीनंतर लगेचच भाजप नेत्यांनी वाजपेयींना भेटण्यास सुरुवात केली. राहुल गांधींनंतर लगेचच राजनाथ सिंह यांनी वाजपेयींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शाह हे देखील रुग्णालयात दाखल झाल्याचं पहावयास मिळालं. त्यानंतर भाजपचे नेते जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वाजपेयी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. एका विरोधी पक्षाच्या अध्यक्षानं रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर भाजपच्या या नेत्यांची मात्र चांगलीच पळापळ झाल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS