राहुल गांधी, लालू प्रसाद यादवांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा !

राहुल गांधी, लालू प्रसाद यादवांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा !

नवी दिल्ली – दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लालू प्रसाद यादव यांची भेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज घेतली आहे. या दोघांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असल्याचं पहावयास मिळत आहे. लालू प्रसाद यादव सध्या चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याचदरम्यान आज त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी हे एम्स रुग्णालयात गेले होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. या चर्चेमुळे सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहे.

दरम्यान 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाची जवळीकता पहावयास मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आरजेडी आणि काँग्रेस एकमेकांसोबत असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS