मायावतींच्या काँग्रेससोबत न जाण्याच्या वक्तव्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया !

मायावतींच्या काँग्रेससोबत न जाण्याच्या वक्तव्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया !

नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत युती करणार नसल्याचं वक्तव्य बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली असून मायावती या 2019 लोकसभा निवडणुकीत नक्कीच काँग्रेससोबत हात मिळवतील. दोन्ही पक्ष एकत्र 2019 लोकसभा निवडणूक लढतील असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान मायावती यांनी काही झालं तरी काँग्रेससोबत युती करणार नाही असं म्हटलं आहे. परंतु ‘बसपासोबत युती न झाल्याने राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त फरक पडणार नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच ‘राज्यातील युती आणि केंद्रातील युती यामध्ये फरक असून मायावती यांनीही तसं सूचित केलं असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच ‘आम्ही जागावाटपावर चर्चा करण्यास नेहमी तयार आहोत. चर्चेसाठी मी नेहमीच उपलब्ध असतो. आम्ही चर्चा स्तरावर असतानाच बसपाने आपला वेगळा मार्ग निवडला आहे’. मात्र राष्ट्रीय निवडणुकीत बसपा आणि काँग्रेस नक्की एकत्र येणार असल्याचं राहुल गांधी म्हणालेत.

 

COMMENTS