तुमच्याकडे गांधी आडनावाशिवाय काय आहे ? या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर !

तुमच्याकडे गांधी आडनावाशिवाय काय आहे ? या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर !

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे ब्रिटनच्या दौ-यावर गेले होते. या दौ-यादरम्यान राहुल गांधी यांना एका पत्रकाराने तुमच्याकडे गांधी आडनावाशिवाय काय आहे ? असा प्रश्न राहुल गांधी यांना करण्यात आला. या प्रश्नाला राहुल गांधी यांनी अगदी शांतेत उत्तर दिलं आहे. एखाद्या व्यक्तीला समजून अथवा त्याला ओळखल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षावर जाण योग्य नाही. तसेच त्या व्यक्तीच्या क्षमतांच्या आधारावर त्या व्यक्तीबाबत मत मांडण गरजेचं आहे ना की त्याच्या परिवाराची निंदा करुन.

दरम्यान तुम्ही माझ्या परिवाराची निंदा करणार की माझ्या क्षमतांच्या आधारावर माझ्याबाबत मत ठरवणार हे तुमच्या विचारश्रेणीवर आधरित आहे. ती तुमची चॉईस आहे. ते तुमच्यावर डिपेंड असून माझ्यावर नाही, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान माझे वडील पंतप्रधान झाल्यानंतर माझं कुटुंब सत्तेत राहिलं नाही. ही गोष्ट विसरली जात आहे. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे मी एका कुटुंबात जन्मलो आहे. मी जे सांगत आहे ते ऐकूण त्या मुद्द्याबाबत माझ्यासोबत चर्चा करा. विदेश निती, अर्थशास्त्र, भारतीय विकास, कृषी क्षेत्र, याबाबत माझ्याशी दिलखुलास चर्चा करा. या विषयावर मला कोणताही प्रश्न विचारायचा असेल तर अवश्य विचारा आणि त्यानंतर माझ्याबाबत मत मांडा असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS