लग्नाबाबत राहुल गांधींनी पहिल्यांदाच दिली ‘ही’ प्रतिक्रिया !

लग्नाबाबत राहुल गांधींनी पहिल्यांदाच दिली ‘ही’ प्रतिक्रिया !

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या विवाहाबाबत प्रश्न विचारला असता उत्तर दिलं आहे. ते म्हणाले माझा विवाह पक्षाशी झाला असून लग्नाबाबत आता कोणताही विचार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सध्याचे ध्येय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचणे हेच असल्याचंही ते म्हणाले आहेत. हैदराबादमध्ये पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही काही समविचारधारा असलेल्या पक्षासोबत चर्चा करत असून भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहोत. भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जेव्हा हे ध्येय पूर्ण होईल, तेव्हा पुढील पंतप्रधान कोण याबाबत चर्चा केली जाईल. सध्या याबाबत आम्ही कोणताही विचार केलेला नसल्याचं स्पष्टीकरणही राहुल गांधी यांनी दिलं आहे.

 

COMMENTS