आरएसएसला भारताचा आत्मा बदलायचा आहे – राहुल गांधी

आरएसएसला भारताचा आत्मा बदलायचा आहे – राहुल गांधी

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी हे सध्या जर्मनी व इंग्लंडच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर टीका केली आहे. आरएसएसला भारताचा आत्माच बदलायचा असून मुस्लीम ब्रदरहूडच्या संकल्पनेशी आरएसएसची संकल्पना मिळतीजुळती असल्याचा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे. ते लंडनमध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज येथे बोलत होते.

दरम्यान भाजपा व आरएसएस भारतीय जनतेमध्ये फूट पाडत असून आमच्या देशामध्ये ते विद्वेश पसवरत आहेत. भलीमोठी भाषणं आपण ऐकली आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत किंवा तरूणांना भविष्याचा मार्ग दिसला असं काही झालं नसल्याची टीकाही यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर केली आहे.

COMMENTS