गांधीजी जोडा म्हणाले, पण मोदींना देशातील सर्व लोकांना तोडायचं आहे – राहुल गांधी

गांधीजी जोडा म्हणाले, पण मोदींना देशातील सर्व लोकांना तोडायचं आहे – राहुल गांधी

वर्धा – वर्ध्यातील सेवाग्राम येथे आज काँग्रेसनं सभा घेतली. या सभेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सभेत बोलताना राफेल करारावरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गांधीजी जोडा म्हणाले, पण मोदींना देशातील सर्व लोकांना तोडायचं आहे.

मी पंतप्रधान होण्याआधी देश झोपला होता असं म्हणत त्यांनी देशवासियांचा अपमान केला आहे. नरेंद्र मोदी यांना जातीपातीत भांडण लावायचं आहे. जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करायचं आहे. जिथे जातात तिथे नकारात्मकता, हिंसा पसरवतात अशी जोरदार टीकाही राहुल गांदी यांनी यावेळी केली आहे.

तसेच राफेलवरुनही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. अनिल अंबानी यांनी संपूर्ण आयुष्यात एकही विमान बनवलेलं नाही. एचएएल इतकी वर्ष विमान निर्मिती करत आहे. पण त्यांच्याकडून काढून घेत अनिल अंबानींना करार देण्यात आला. 30 हजार कोटी त्यांच्या खिशात घालण्यात आले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

तसेच नरेंद्र मोदींनी शेतकरी, तरुणांना खोटी आश्वासनं दिली. खात्यात 15 लाख जमा करणार होते, 2 कोटी रोजगार निर्मिती करणार होते. पिकांना योग्य किंमत देईन असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र त्याचं काहीच झालं नाही त्यामुळे फक्त सत्तेवर येण्यासाठी त्यांनी जनतेला आश्वासनांचं गाजर दाखवलं असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.

 

COMMENTS