रायगडमध्ये भाजपचा राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंना पाठिंबा ?

रायगडमध्ये भाजपचा राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंना पाठिंबा ?

रायगड – कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये बिनसलं आहे. त्यामुळे भाजपनं शिवसेनेला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला असून भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तसेच सर्व मतदार अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले असल्याचीही माहिती आहे. अनिकेत तटकरे राष्ट्रवादीचे उमेदवार असून सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान पालघर पोटनिवडणूक उमेदवारीचा फटका शिवसेनेला बसला असल्याचं दिसून येत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं चिंतामण वनगा यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन भाजपला कोंडीत पकडले. त्यामुळे खवळलेल्या भाजप श्रेष्ठींनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व दबाव तंत्राचा वापर केला. मात्र त्याला कोणत्याच पक्षानं साथ दिली नाही. महाराष्ट्रात पालघर सोबतच गोंदिया लोकसभेची ही पोट निवडणूक होतेय. मात्र पालघर मतदारसंघात मित्र पक्ष शिवसेनेनं उभं केलेलं आव्हान भाजपच्या जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपनं शिवसेनेचा पाठिंबा काढला असून राष्ट्रवादीला मात्र याचा फायदा झाला असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS