रायगड – शिवसेना जिल्हाप्रमुखांचा तडकाफडकी राजीनामा !

रायगड – शिवसेना जिल्हाप्रमुखांचा तडकाफडकी राजीनामा !

अलिबाग – रायगडच्या  शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. देसाई हे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर नाराज असल्याची चर्चा असून जिल्ह्यात उद्योग असूनही शिवसैनिक उपेक्षित असल्याची नाराजी त्यांनी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. प्रकाश देसाई यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बला आहे.

दरम्यान गेली तीन वर्षे देसाई रायगड जिल्हा प्रमुख पदावर कार्यरत होते. जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असला तरी यापुढे मात्र शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच देसाई हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांचे निकटवर्तीय मानले जातात. जिल्ह्यात बेरोजगारी वाढली आहे. अनेक मोठमोठे उद्योग असतानाही शिवसैनिक उपेक्षित असल्याची भावना प्रकाश देसाई यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ते अनंत गीते यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS