रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, माजी जिल्हाप्रमुखाचा राष्ट्रवादीत प्रवेश ! VIDEO

रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, माजी जिल्हाप्रमुखाचा राष्ट्रवादीत प्रवेश ! VIDEO

रायगड – आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखानं राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. परंतु जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान रायगडमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत रोहा याठिकाणी संविधान बचाव देश बचाव अंतर्गत महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे, महिला अध्यक्षा फोजिया खान, सुरेखा ठाकरे, विद्या चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे हे उपस्थित होते.

COMMENTS