रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्याची पूर्ववैमनस्यातून हत्या !

रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्याची पूर्ववैमनस्यातून हत्या !

रायगड – रायगडमधील पोलादपूर तालुक्यात शिवसेना कार्यकर्त्याची पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलादपूर तालुक्यातील माटवण येथील ज्येष्ठ शिवसैनिक गणपत मांढरे यांच्यावर रविवारी सायंकाळी हल्ला झाला होता. मांढरे यांच्यावर लाठ्या, काठ्या आणि बांबूंनी मारहाण करण्यात आलू होती. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून पुरातन शिव मंदिराच्या तलावाजवळ त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. दोन आरोपींनी मांढरे यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेह आणल्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी आज सकाळी करण्यात आली आहे. मात्र आरोपींना पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मयत गणपत मांढरे यांच्या मुलाने घेतला आहे.मृताच्या अंगावरील मार भीषण स्वरुपाचा असल्याने पोलीस कसोशीने घेत असून पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव आणि अन्य सहकारी तपास करत आहेत.

COMMENTS