रायगड जिल्हा परिषदेत शेकाप – राष्ट्रवादीची सत्ता कायम, जळगावात भाजपनं गड राखला !

रायगड जिल्हा परिषदेत शेकाप – राष्ट्रवादीची सत्ता कायम, जळगावात भाजपनं गड राखला !

रायगड – रायगड जिल्हा परिषद निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी शेकापच्या योगिता पारधी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही पदासाठी एकमेव अर्ज आले होते. शिवसेनेकडून एकही अर्ज आला नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाय्रांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत शेकाप – राष्ट्रवादी सत्ता कायम आहे. तर जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं गड राखला आहे.

अध्यक्षपदी भाजपच्या रंजना पाटील यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होतू. गेल्या 30 वर्षांपासून भाजपची जळगाव जिल्हा परिषदवर निर्विवाद सत्ता आहे. याच पार्श्वभूमीवर काल(गुरुवार)एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे मनोमिलन झाल्याचे बोलले जात होते. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील खडसेंची मनधरणी केली होती. त्यामुळे याठिकाणी भाजपला गड राखता आला आहे.

COMMENTS