निवडणूक लढवण्याबाबत राज ठाकरेंची मोठी घोषणा, दोन उमेदवारही केले जाहीर!

निवडणूक लढवण्याबाबत राज ठाकरेंची मोठी घोषणा, दोन उमेदवारही केले जाहीर!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं आज स्पष्ट केलं आहे. मुंबईतल्या वांद्र्यातील एमआयजी क्लब येथे मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी मनसे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. यावेळी राज ठाकरे यांनी दोन उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत. मंत्रालयात आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. नरेंद्र पाटील मनसेकडून निवडणूक लढणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. तर नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार यांनीही मनसेत प्रवेश केला आहे. ते देखील देखील निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे.

दरम्यान 5 ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचंही राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. मात्र ही प्रचारसभा कुठे असणार याची कोणतीही माहिती राज ठाकरेंनी दिली नाही. तसेच मनसे विधानसभेच्या किती जागा लढवणार याचीही माहिती राज ठाकरेंनी देणं टाळलं आहे. 5 तारखेला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. मनसेनंही आता विधानसभा निवडणुकूच्या मैदानात उडी घेतल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS