विविध उपहासात्मक केक कापून राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा !

विविध उपहासात्मक केक कापून राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा !

मुंबई – मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांचा आज 50 वा  वाढदिवस. त्यांच्या हा वाढदिवस राज्यभरातील मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून साजरा केला जात आहे. यानिमित्तानं अनेक ठिकाणी उपहासात्मक केक कापून राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा केला जात आहे. वेगळा विदर्भची मागणी करणाऱ्या माजी अभिवक्ता श्रीहरी आणे यांच्या फोटोचा केक कापून निषेध करण्यात आला आहे.

दरम्यान यानिमित्तानं काही कार्यकर्त्यांनी विविध उपहासात्मक केक कापले आहेत. त्यामध्ये

  1. EVM
  2. नाणार पेट्रो रिफायनरी
  3. श्रीहरी अणे
  4. भाजपचे गाजर
  5. मोदी गाजर                                                                                                 

अशी नावे देऊन निषेध करण्यात आला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमिताने मुंबईत 36 पेट्रोल पंपवर 4 रुपये सवलतीच्या दरात दुचाकी चालकांना पेट्रोलही उपलब्ध करून दिलं गेलं आहे. त्यामुळे एकूणच विविध पद्धतीने राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असल्याचं पहावयसा मिळालं आहे.

COMMENTS