राज ठाकरेंची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत फोनवरुन चर्चा !

राज ठाकरेंची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत फोनवरुन चर्चा !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आहे. आंदोलन केलेल्या जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींना रेल्वे नोकरीत सामावून घेण्याची मागणी राज यांनी केली आहे.  तसेच प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांचा सहनुभूतीपूर्वक विचार करावा. तसेच आंदोलक प्रशिक्षणार्थी गुन्हेगार वृत्तीचे नाहीत. त्यामुळे आंदोलनाबाबत त्यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही राज ठाकरे यांनी पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. तसेच राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीला पियुष गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान काल मनसे नेत्यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन पियूष गोयल यांची भेट घेतली होती. त्यावेळी नोकर भरतीत रेल्वे बोर्ड प्रणालीने ठरविलेल्या २० टक्के राखीव कोट्याअंतर्गत रेल्वेमध्ये अप्रेंटिस केलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनाच सामावून घेतले जाईल असे आश्वासन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मनसेच्या शिष्टमंडळास दिले होते. तसेच  रेल्वे अप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या नोकरी नियुक्तीबाबत सप्टेंबर २०१७ च्या निर्णयाला अधीन राहून या प्रशिक्षणार्थीच्या निवडीबाबत सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याचे आश्वासन देखील रेल मंत्र्यांनी यावेळी दिले आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे.

COMMENTS