राज ठाकरेंचं आणखी एक व्यंगचित्र !

राज ठाकरेंचं आणखी एक व्यंगचित्र !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलं आहे. या व्यंगचित्रात  राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर टीका केली आहे. त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज दाखवले आहेत. महाराजांच्या मदतीनं त्यांनी राज्याच्या जनतेची कान उघाडणी केली आहे. त्यांनी यामध्ये बिन चेहऱ्याचे जातीपातीचे नेते दाखवले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या जातीच्या लोकांशी संवाद साधत असल्याचं या व्यंगचित्रात दाखवलं आहे.

COMMENTS