कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून मार्मिक भाष्य !

कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून मार्मिक भाष्य !

मुंबई  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकाच्या राजकीय घडामोडींवर व्यंगचित्र काढलं असून या व्यंगचित्रातून त्यांनी मार्मिक भाष्य केलं आहे. कर्नाटकमध्ये भाजपाच्या घशातून सत्ता खेचून आणल्याचं व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढलं आहे. या व्यंगचित्रात जेडीएसचे कुमारस्वामी बाजूला उभे असल्याचं दाखवण्यात आलं असून अमित शाह यांच्या घशातून काँग्रेसनं सत्ता बाहेर काढली असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर- काँग्रेस सरकारचा शपथविधी बुधवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकमधील घडामोडींवर व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रातून त्यांनी काँग्रेसनं कशाप्रकारचे भाजपच्या घशातली सत्ता खेचून घेतली हे दाखवलं आहे. दरम्यान व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी काढलेल्या चिमट्याला भाजप काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS