मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ, राज ठाकरेंचे व्यंगचित्राद्वारे फटकारे !

मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ, राज ठाकरेंचे व्यंगचित्राद्वारे फटकारे !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यंगचित्राद्वारे जोरदार टीका केली आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत मीच मुख्यमंत्री असेन. त्यामुळं काळजी करू नका असं आश्वासनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यावर आता राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका जाहजेत झोपले असल्याचं व्यंगचित्रात राज यांनी दाखवलं आहे. त्यामध्ये त्यांनी परंतु देवेंद्रजी, पुन्हा लाट येईल असे वाटत नाही, तसेच राज्याची आर्थिक परिस्थिती आणि राज्याती खरिप हंगामाबरोबर रब्बी हंगामही धोक्यात आला असल्याचं राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात मजकूर लिहिला आहे.

COMMENTS