राज ठाकरेंचा बाबा रामदेव यांना व्यंगचित्राद्वारे टोला !

राज ठाकरेंचा बाबा रामदेव यांना व्यंगचित्राद्वारे टोला !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे बाबा रामदेव यांना टोला लगावला आहे. नेत्रासन केल्याने दृष्टी सुधारते असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही दाखवलं आहे. रामदेव बाबा दोघांकडेही पाहत असल्याचं दाखवण्यात आलं असून बाजूलाच पंतप्रधान कोण होईल हे सांगणं कठीण असल्याचं बाबा रामदेव यांचं वक्तव्य लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी पुढील पंतप्रधान कोण होईल हे सांगणं कठीण असल्याचं म्हटलं होतं. याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी रामदेव बाबा यांच्यावर टीका करत नेत्रासन करण्याचा सल्ला दिला आहे.

COMMENTS