लोकसभा निवडणुकीनंतर देश शुद्धीवर येणार, राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

लोकसभा निवडणुकीनंतर देश शुद्धीवर येणार, राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

मुंबई – ‘गेल्या साडे चार वर्षात भारतावर खूपच अत्याचार झाल्याने तो आयसीयूत पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीनंतरच आता तो शुद्धीवर येईल’, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून केली आहे.

राज ठाकरे यांनी धनत्रयोदशीनिमित्त व्यंगचित्र रेखाटले आहे.. धनत्रयोदिवशी हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो. वैद्यकीय शास्त्राचा देव धन्वंतरी ह्याचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात, असं यात राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच यात आयसीयूमध्ये भारताला दाखवण्यात आलं आहे. धन्वंतरी आयसीयूबाहेर जमलेल्या लोकांना उद्देशून सांगतात, ‘काळजीचे कारण नाही. गेल्या साडे चार वर्षात त्याच्यावर (भारतावर) खूप अत्याचार झालेत. लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर येईल.

COMMENTS