पंतप्रधान मोदींनी उडवलं पतंग, राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

पंतप्रधान मोदींनी उडवलं पतंग, राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून लक्ष्य केलं आहे.
मोदी सरकारनं गेल्याच आठवड्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच संसदेत याबद्दलचं विधेयक मंजूर करुन घेण्यात आलं. मात्र अनेक घटनातज्ज्ञांनी हे आरक्षण तांत्रिकदृष्ट्या टिकणार नाही, असा अंदाज व्यक्त केला. त्यावरुन मोदींची नवी थाप असं व्यंगचित्र राज यांनी रेखाटलं आहे. मोदी अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत पतंग उडवत आहेत. त्या पतंगावर ‘नव्या थापा 10% आरक्षण’ असा मजकूर आहे. मोदी आणि आसपासचा गोतावळा आनंदानं पतंग उडवत असल्याचं राज यांनी व्यंगचित्रात दाखवलं आहे. मात्र त्याच गच्चीवर असलेल्या भाजपनं याकडे पाठ फिरवली असल्याचं राज यांनी व्यंगचित्रातून म्हटलं आहे. तसेच मेक इन इंडिया, नोटाबंदी, स्वच्छ भारत, जीएसटी, देशी काळा पैसा, डिझेल-पेट्रोलचे दर, कर्जमाफी, प्रतिवर्षी 2 कोटी रोजगार, परदेशी काळा पैसा, नीरव मोदी, मल्ल्या, चोक्सी आणि इतर असा मजकूर असलेले पतंग गच्चीवर पडल्याचं चित्र राज यांनी त्यांच्या व्यंगचित्रात दाखवलं आहे.

COMMENTS