तब्बल नऊ तासांनंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर !

तब्बल नऊ तासांनंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर !

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल नऊ तासांनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत. सकाळी अकरा वाजता त्यांच्या चौकशीला सुरवात झाली होती. तब्बल नऊ तासांनंतर त्यांची सुटका झाली.संध्याकाळी 8 वाजेच्याच सुमारास राज बाहेर आले. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी आणि मुलगा अमित हजर होते. उर्वशी भावूक झाल्या असल्याचं पहावयास मिळाले.

दरम्यान दादरमधील कोहिनूर’ प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते. त्यानंतर राज यांनी आज ईडीच्या कार्यालयात सकाळी अकराच्या दरम्यान हजेरी लावली. त्यानंतर राज यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान राज ठाकरे यांचा जबाबही टप्प्याटप्प्याने नोंदवण्यात आला. दरम्यान, राज ठाकरेंना उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येणार नसल्याची माहिती आहे.

COMMENTS