राज ठाकरेंना ईडीकडून नोटीस, मनसेचा आक्रमक पवित्रा!

राज ठाकरेंना ईडीकडून नोटीस, मनसेचा आक्रमक पवित्रा!

मुंबई – दादरमधील कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. याबाबत मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला असून आम्ही चौकशीला सामोरे जाऊ, कर नाही त्याला डर कशाला? आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

दरम्यान नव्या भारताचे नवीन हिटलर जर कोणी असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जो तुमची प्रकरणं बाहेर काढेल, जो तुमच्याविरोधात बोलेल, त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप मनेसनं केला आहे. सीबीआय, ईडी भाजपचे कार्यकर्ते झाले आहेत आणि या कार्यकर्त्यांशी कसं डील करायचं हे मनसेला माहीत असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हयलं आहे. याबाबत विरोधी पक्षातील नेत्यांनीही सरकारवर टीका केली आहे. सरकार सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

COMMENTS