मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त !

मुंबई – कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ईडीच्या कार्यालयात उपस्थिती लावली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या आई, पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, पुत्र अमित, सून मितालीही उपस्थित आहेत. ईडी कार्यालयाच्या जवळपास चहूबाजूंनी पोलिसांनी बॅरिकेटिंग केली आहे. मनसेचा विरोध पाहता, मुंबईतील प्रत्येक चौकात आणि मुख्य रस्त्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात मनसेकडून बंदचे आवाहन करण्यात आले होते. तसेच अनेक कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयावर जाणार होते. परंतु राज ठाकरे यांच्या आदेशानंतर बंद मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

COMMENTS