दोन दिवसात गद्दारांना पक्षातून हाकलून देणार, राज ठाकरेंचा इशारा!

दोन दिवसात गद्दारांना पक्षातून हाकलून देणार, राज ठाकरेंचा इशारा!

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसात गद्दारांना पक्षातून हाकलून देणार असल्याचा इशारा दिला आहे.पक्षातील काही लोक गद्दार आहेत. ते अत्यंत खोट्या आणि चुकीच्या बातम्या माध्यमांना देत आहेत. अशा कार्यकर्त्यांची नावे माझ्याकडे आली आहेत. अशी लोकं मला पक्षात नको असून येत्या दोन-तीन दिवसांत यांचं काय करायचं याबाबत निर्णय घेणार असल्याचं राज ठाकरे म्हणालेत. राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

दरम्यान राज ठाकरे दोन दिवसांपासून पक्ष बांधणीसाठी औरंगाबादमध्ये आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत संवाद साधत आहेत. यावेळी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात कोणतंही स्थान नाही. काही जण मुद्दामहून पक्षाची बदनामी करत आहेत. अशा लोकांची नावं मला कळाली आहेत. त्यामुळे यांच्यावर लवकरच कारवाई करणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS