संजय बरं बोलतोस, येतो का आमच्या पक्षात”, राज ठाकरेंची मित्राला खुली ऑफर!

संजय बरं बोलतोस, येतो का आमच्या पक्षात”, राज ठाकरेंची मित्राला खुली ऑफर!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्टेजवरुनच आपल्या एका मित्राला पक्षात येण्याची खुली ऑफर दिली.पुढे भाषण सुरू असताना व्यासपीठावर असलेले व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांच्याकडे पाहत राज ठाकरेंनी त्यांना मनसेत येण्याचे जाहीर निमंत्रण दिले. कार्टूनिस्ट कंबाइनचे संजय मिस्त्री यांना, “संजय बरं बोलतोस, येतो का आमच्या पक्षात” असं राज ठाकरे म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला.

दरम्यान राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील ‘इंक अलाईव्ह’ कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी स्वतःच्या पदवीबद्दल एक खुलासा केला. “शिक्षणासाठी पदवी लागते. कलेला पदवी लागत नाही. माझ्याकडे कोणत्याही प्रकारची पदवी (डिग्री) नाही,” असं राज ठाकरे म्हणाले. आज याठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित हवे होते. केवळ आणि केवळ व्यंगचित्राचा कार्यक्रम असल्यामुळे मी पुण्यात आलो आहे. माझं दुसरं कोणतंही काम नाही. प्रत्येकामध्ये एखादी कला असते. कोणतीही कला जपणं ती वाढवणं आवश्यक आहे. जगात शिक्षणाला डिग्री लागते, कलेला लागत नाही. जगात कुठेही बिना डिग्रीचा प्रवास करता येतो. राज्य सरकारकडून जेव्हा चित्रकला हा विषय ऑप्शनला टाकला जातो त्यावेळी अशा संस्था उभं राहणं महत्त्वाचं असतं. चित्रकलेला मरण नाही. त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील कला हेरली पाहिजे. त्यांच्यामधील कला वाढविण्यासाठी प्रयत्नही केला पाहिजे. असंही राज ठाकरे म्हणाले.

तसेच मला राजकीय व्यंगचित्र शिकायचे होते. त्यामुळे मी मधूनच शिक्षण सोडले आणि जे. जे. आर्ट ऑफ स्कूलमध्ये व्यंगचित्र शिकलो. त्यामुळे माझ्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नाही आणि मला कोणीही डिग्रीबद्दल आतापर्यंत विचारले नाही, असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS