राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्याला 1993 मध्ये लिहिलेलं  ‘ते’ पत्र व्हायरल!

राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्याला 1993 मध्ये लिहिलेलं ‘ते’ पत्र व्हायरल!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लिहिलेलं एक पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राज ठाकरेंनी एका कार्यकर्त्याला १९९३ मध्ये पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. या पत्रावर 4-12-1993 अशी तारीख आहे. यामध्ये त्यांनी “हे राष्ट्र जो पर्यंत हिंदूंचे होत नाही तो पर्यंत आपला लढा चालू ठेवायचा आहे.” “महाराष्ट्र विधानसभेवर जो पर्यंत आपला प्राणप्रिय भगवा झेंडा फडकत नाही तो पर्यंत शांत बसायचे नाही” असं म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS