मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, वाईन शॉप्स सुरु करण्याची केली मागणी!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, वाईन शॉप्स सुरु करण्याची केली मागणी!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी वाईन शॉप्स सुरु करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्राचं रुतलेलं अर्थचक्र बाहेर काढावंच लागेल, अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय घ्यावेच लागतील. यासाठी हॉटेल्स आणि वाईन शॉप्स पुन्हा सुरु करुन बघायला काय हरकत आहे? असं जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. पार्सल सेवा देताना ग्राहकांमध्ये पुरेसे अंतर राखले जात आहे आणि स्वच्छता ठेवली जात आहे, याची जबाबदारी हॉटेल मालकांची असेल. यातून राज्यातील मृत अर्थव्यवस्थेत धुगधुगी येईल’, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान दारुवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला 41.66 कोटी, महिन्याला 1250 कोटी आणि वर्षाला 15 हजार कोटी मिळतात. जवळपास 35 दिवस झाल्याने राज्याने किती महसूल गमावला आणि किती गमावू याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं आहे.
तसेच गेले 35 दिवस महाराष्ट्रातील उपहारगृहे आणि रेस्टॉरंट पूर्णपणे ठप्प आहेत. याचा फटका हॉटेल व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांच्या रोजगाराला बसला आहे, तसा सामान्यांनाही बसला आहे. आज मुंबई आणि इतर शहरांमध्ये हॉटेल ही काही चैनीची गोष्ट राहिली नाही, तर ती गरज बनली आहे.’ असं राज ठाकरे यांनी लिहिलं आहे. त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS