‘हा’ अट्टहास कशासाठी आणि कोणासाठी ?, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र!

‘हा’ अट्टहास कशासाठी आणि कोणासाठी ?, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द केल्या जाव्यात अशी मागणी केली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी आणि कोणासाठी ? अशी विचारणा राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्या आणि यामध्ये कोणत्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये अशी विनंतीच राज ठाकरे यांनी राज्यपालांना केली आहे. इतक्या मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात घालण्यामागचं प्रयोजन काय आहे? असा सवालही राज यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती इतकी भीषण आहे की, देश गेले दोन महिने लॉकडाउनमध्ये आहे आणि सध्याची किमान मुंबई आणि पुणे परिसरातील परिस्थिती पाहता हा भाग अजून किती काळ टाळेबंदीत राहील याचं भाकीत कोणीच करु शकत नाही. बरं जर लॉकडाउन शिथील झाला तरी याचा अर्थ करोना संपला असा होत नाही हे आपणदेखील जाणता. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी आणि कोणासाठी ?,अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली आहे.

COMMENTS