मनसेकडून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा, राज ठाकरेंनी घेतली भेट !

मनसेकडून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा, राज ठाकरेंनी घेतली भेट !

राळेगणसिद्धी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी मनसेकडून अण्णांचा आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या नालायक लोकांसाठी जीवाची बाजी लावू नका, सत्तेत असलेले सर्वजण खोटारडे लोक असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अण्णामुळे मोदी आज सत्तेत असून त्यांच्यासाठी जीव धोक्यात घालू नका असं राज ठाकरे यांनी अण्णांना म्हटलं आहे. तसेच राज यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील टीका केली असून आज अरविंद केजरीवाल यांनी येथे यायला हवे होते, अण्णा नसते तर केजरीवाल यांना कोण ओळखत होते असंही राज यांनी यावेली म्हटलं आहे.

COMMENTS